सुपारी देऊन पत्नीने केली पतीची हत्या

दारू पिऊन छळ करणाऱ्या नवऱ्याची बायकोनं सुपारी देउन हत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये... 

Updated: Oct 14, 2015, 05:18 PM IST
सुपारी देऊन पत्नीने केली पतीची हत्या  title=

पुणे : दारू पिऊन छळ करणाऱ्या नवऱ्याची बायकोनं सुपारी देउन हत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये... 

मुळशी इथं 4 तारखेला एका माणसाचा मृतदेह आढळला होता. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा, असा अंदाज होता. मात्र शवविच्छेदनामध्ये हा घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. 

त्यानंतर पोलिसांच्या तपासाची सूत्रं फिरली आणि गणेश कोकाटे नामक या व्यक्तीची हत्या पत्नीनंच करवली असल्याचं समोर आलं... या कविता असं तिचं नाव आहे... या प्रकरणी कविताची मैत्रिण कुंदा आणि तिचा भाऊ सुभाष खेंगरे यांना अटक करण्यात आलीये... तर कविता आणि ज्यानं खून केला तो युवराज फरार आहेत...  

पाहा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.