अवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!

 राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.  

Updated: Apr 12, 2015, 04:27 PM IST
अवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! title=

मुंबई :  राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.  

पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 14 एप्रिलनंतर पावसाचा जोर कमी होईल आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर, पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. 

अवकाळी पाऊस आणि गारपीट
अखेर स्कायमेटचा अंदाज खरा ठरला. राज्याच्या बहुतांश भागाला काल अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झोपडपलं. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलं असून अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्राला बसलाय. 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपलं... अनेक ठिकाणी  गारांचा खच साचून कांदा, डाळींबासह फळबागांचे  मोठं नुकसान झाले.  या पावसामुळं काढणीला आलेला आणि काढणी झालेला कांदा भुईसपाट झालाय. येवला शहरातही अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. कांदा व्यापाऱ्यांच्या कांदा चाळी देखील तुटून पडल्यात. याशिवाय द्राक्ष, डाळिंब, हरभरा या पीकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. अहमदनगरमध्येही भाजीपाल्यासह आंबा, संत्री, डाळींब यांसारख्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर आधीच दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यावर आता अवकाळी पाऊस आणि गारपीटीचं संकट ओढावलंय. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली. पुढील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. गुजरातवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालीये तसंच दक्षिण गुजरातपासून महाराष्ट्र कर्नाटक ते लक्षद्वीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीच होत आहे.

पुण्यातही गारांसह पाऊस
पुण्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली.. तर काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला... पुण्यातल्या दिवेघाट, सासवड, पुरंदर भागात गारांसह पाऊस झाला... 

जळगावात पिकं भुईसपाट 
जळगाव जिल्ह्यात वादळी वा-यासह आलेल्या पावसाने शेतक-यांचं मोठं नुकसान केलंय. चाळीसगाव तालुक्याला सर्वाधिक तडाखा बसलाय. मोसंबी, आंबा, केळी, लिंबू, डाळिंब या फळबागांचं तर कांदा, मका, टोमॅटो, ज्वारी, बाजरी ही रब्बी पिकं भुईसपाट झाली आहेत. वादळामुळे शिंदी या गावातल्या 10 घरांचे पत्रे उडून गेले. जोरदार पावसामुळे नाल्यांना पूर आले. अंमळनेर, पारोळा, धरणगाव यासह अनेक ठिकाणी रात्री मोठमोठाल्या गारा पडल्या आहेत. आमदार उन्मेष पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून पंचनाम्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या आहेत.

घरांना छप्परही उरलं नाही... 
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपलं... अनेक ठिकाणी  गारांचा खच साचून कांदा, डाळींबासह फळबागांचे  मोठं नुकसान झाले.  या पावसामुळं काढणीला आलेला आणि काढणी झालेला कांदा भुईसपाट झालाय.. तर अनेक घरांचं छप्पर उडून गेल्याचंही पाहायला मिळालं.. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही पाहायाला मिळाल्या.

येवल्यात शेतकऱ्यांची दाणादाण
येवला शहर आणि तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय.. जोरदार वादळी वारा आणि वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं शेतक-यांची दाणादाण उडवली.. नुकताच काढलेल्या कांदा पीकाचंही या पावसामुळं अतोनात नुकसान झालंय... कांदा व्यापा-यांच्या कांदा चाळी देखील तुटून पडल्यात... याशिवाय द्राक्ष, डाळिंब, हरभरा या पीकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसलाय.. वादळी वारा आणि पावसामुळं ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्यात.. तसंच काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झालाय.. 

मराठवाड्यातही गारपीट...
मराठवाड्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय... मराठवाड्याच्या विविध भागात  शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे.. दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं संकटात सापडलेल्या बळीराजावर या पावसामुळं पुन्हा एकदा मोठं संकट कोसळलंय.. अचानक आलेल्या पावसामुळं शेतक-यांची पिकं उद्धवस्त झालीत.. य़ा पावसाचा फटका आंबा बागेला बसलाय.. तर काही गावात पावसामुळं घरावरील पत्रे उडून गेल्याची आणि वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्यात... तर औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात गारपीट झालीय.. त्यामुळं दोन जनावरंसुद्धा दगावलीत.. 

बीडमध्ये गारांचा पाऊस
बीडलाही अवकाळी पावसानं झोडपडलंय.. या पावसामुळं शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय.. या पावसाने सखल भागात पाणी साचलं होतं... तर काही भागात छोट्या छोट्या गारा देखील पडल्या...  

घरातलं धान्य पाण्यात वाहून गेलं... 
अहमदनगर जिल्ह्यासह ग्रामीण भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. काल रात्री आणि आज पारनेर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गारपीट मध्ये फळांच्या बागा, शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. .. भाजीपाल्यासह आंबा, संत्री, डाळींब यांसारख्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने घरातील धान्य पाण्यासह वाहून गेले आहे. टँकरने पाणी पुरवठा करून तोंडाशी आलेला घास गारपीट आणि पावसाने हिसकावून नेल्याने शेतकरी हवालदील झालाय.

नगर जिल्ह्यासह शहरात शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी काल वादळी  गारांचा पावसाने नुकसान केले आहे. संगमनेर, रहाता, कोपगाव तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. कांदा, गहू व कैऱ्यांचे या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणखी तीन दिवस हवामान खात्याने गारांच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.