मुंबई : राज्यात काल दुपारपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं धुमशान घातलं आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबद जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे. राज्यात आणखी दोन दिवसात म्हणजे १४ एप्रिल रोजी पाऊस होणार असल्याचा अंदाज खासगी संस्था स्कायमेटने वर्तवला आहे.
राज्यातला हा पाऊस फक्त अवकाळीच म्हणता येणार नाहीतर नुकसान कारक सुद्धा आहे. अनेक ठिकाणी गारा पडल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे बागायती पिकांना फटका बसला आहे. तसं पाहता राज्यात अंदाजे ६० ते ६५ टक्के जमीन पुढील मशागतीसाठी पडून आहे, मात्र फळपिकांना, तसेच कांद्याला याचा मोठा फटका बसणार आहे, हे निश्चित. उन्हाळी बाजरी, तिळीचं हा पाऊस अधिक नुकसान करतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.