राज ठाकरेंचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. झाले तेवढे बस झाले. यापुढे मी बेशिस्त खपवून घेणार नाही, सगळ्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागा, असा आदेशच दिला.

Updated: Nov 22, 2014, 12:10 PM IST
राज ठाकरेंचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सज्जड दम title=

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. झाले तेवढे बस झाले. यापुढे मी बेशिस्त खपवून घेणार नाही, सगळ्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागा, असा आदेशच दिला.

आता अधिक चांगले काम करण्याची वेळ आलेय. फक्त निवडणुका म्हणजे पक्षकार्य नव्हे, अशी ताकीद राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात दिली.

वाढदिवसाचे बॅनर लावत फिरण्यापेक्षा लोकांशी सरळ संपर्क साधून त्यांच्यापर्यंत पक्ष पोहोचविण्याचे काम करा. वाढदिवसाचे बॅनर लावल्यास पदावरून हकालपट्टी केली जाईल. यापुढे कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी राज यांनी दिली.

राज्यातील जनता आपल्याकडे आशेने पाहात आली आहे. त्यांचा निराशा होईल, असे काही करु नका. तुम्ही चौकटीच्या बाहेर गेलात तर पक्षातून बाहेर जाल, असे सष्ट राज यांनी यावेळी बजावले. लोक आपल्याकडे आशेने आणि अपक्षेने पाहात आली आहे आणि पाहात आहे. तुम्ही त्यांचे मने जिंका, मते आपोआप मिळतील. जे काही आखून दिलं आहे. त्याप्रमाणे काम करा, नाहीतर बाहेरच रस्ता दाखविला जाईल, असे ते म्हणालेत.

राज ठाकरे यांच्याकडे तक्रार, सूचना आता तुम्ही थेट करु शकणार हेत. त्यासाठी connectrajthackeray@gmail.com वर मेल करू शकता, असे राज यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाने आखून दिलेली चौकट यापुढे पाळावीच लागेल, असा इशारा पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. मात्र, पवारांच्या नावाचा उल्लेख टाळला. दहा तोंडी रावण' असा टोला लगावला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.