पुणे : राज्य सरकार आणि पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट यांनी संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या साखर परिषदेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र शब्दांत टीका केली आहे. ही परिषद म्हणजे निवडक कंपूचा कार्यक्रम असल्याची टीका स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.
साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना बुडवणाऱ्यांना जेलमध्ये टाकू, असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. आता त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्री फडणवीस बसतायत. त्यामुळे त्यांनी एकतर आश्वासन खोटं होतं किंवा आरोप खोटे होते हे जाहीर करावं, असं आव्हानच शेट्टींनी दिलंय.
स्वाभिमानी बरोबरच इतर शेतकरी संघटनांनादेखील या परिषदेचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. ही परिषद ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर कारखानदारांच्या फायद्यासाठी बोलावण्यात आल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.