पर्यटकांना खुणावतायत कुकडी नदीवरचे ‘रांजण खळगे’

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कुकडी नदीवरील हे वैशिष्टयपूर्ण कुंड आहेत. आणखी एक विस्मयकारी बाब म्हणजे या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा अटत नाही.

Updated: Nov 8, 2014, 06:01 PM IST
पर्यटकांना खुणावतायत कुकडी नदीवरचे ‘रांजण खळगे’ title=

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कुकडी नदीवरील हे वैशिष्टयपूर्ण कुंड आहेत. आणखी एक विस्मयकारी बाब म्हणजे या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा अटत नाही.

रांजण खळगे... कदाचित  अनेकाना हा शब्द नवीन असेल... मात्र, हा रिपोर्ट पाहिल्यावर तुम्हाला निसर्गाचा एक वेगळा अविष्कार लक्षात येईल.

पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कुकडी  नदीपात्रात निसर्गाचा चमत्कार पहायला मिळतोय. ‘रांजण खळगी’ म्हणजे नदीपात्रात असलेल्या खडकात  पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले  खड्डे... 

भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठीही अभ्यासक इथं येत असतात. हे खड्डे पर्यटकांनाही आकर्षित करत आहेत. अलीकडच्या काळात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड’मध्येही या खळग्यांची नोंद झालीये. त्यामुळेही या भागाचं महत्त्व वाढलंय. कुकडी  नदी पात्राच्या दोनी बाजूस असलेली मळगंगा देवीची दोन मंदिर आणि या दोनी मंदिरांना जोडणारा काही दिवसापूर्वी राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आलेला ‘झुलता पूल’ हे इक इथलं मोठं आकर्षण आहे. त्यामुळेही पर्यटकांची गर्दी वाढतेय. 

कुकडी नदी पात्रात २०० मी लांब व ६० मी. रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार पहायला मिळतात . या रांजण  खळग्याना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. पाठ्यपुस्तकातही या रांजण खळग्यांचा समावेश झालेला आहे. कुकडी नदीला निसर्गानेच जणूकाही हे कुंड देऊन छान गिफ्ट दिलंय. त्यामुळं कुकडीचं सौदर्यंही वाढलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.