शिवसेना आक्रमक, पराभवानंतर संपर्क प्रमुखांची उचलबांगडी

राज्यातील पराभव शिवसेनेला खूपच जीवाला लागला आहे. त्यातच सत्तेत सहभागी होण्याबाबत भाजप झुलवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीवेळी शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मातोश्रीवरुन तिन जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुखांची उचलबांगडी केलेय.

Updated: Nov 8, 2014, 03:10 PM IST
शिवसेना आक्रमक, पराभवानंतर संपर्क प्रमुखांची उचलबांगडी title=

सातारा : राज्यातील पराभव शिवसेनेला खूपच जीवाला लागला आहे. त्यातच सत्तेत सहभागी होण्याबाबत भाजप झुलवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीवेळी शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मातोश्रीवरुन तिन जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुखांची उचलबांगडी केलेय.

पुणे, सागंली आणि साता-यातील दारुण पराभवानंतर शिवसेना संपर्क प्रमुखांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पुण्याच्या संपर्क पदावरुन गजाजन किर्तीकर आणि सांगली, साता-याच्या संपर्क प्रमुख पदावरुन दिवाकर रावते यांना डच्चू देण्यात आलाय. 

अमोल कोल्हे पुणे आणि मावळचे नवे संपर्क प्रमुख झाले आहेत. तर नितीन बानगुडे पाटील सांगली आणि साता-याचे नवे संपर्क प्रमुख झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.