नागपूरमध्ये बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनीच गुन्हेगारी वाढल्याची दिली कबुली.

Updated: Dec 15, 2015, 06:07 PM IST
नागपूरमध्ये बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे चांगलंच लक्ष वेधलं गेलंय. कारण मुख्यमंत्री हे खुद्द नागपूरचे असल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी गृहखातंही स्वत:कडेच ठेवल्याने मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका झाली. पण आता स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हेगारी वाढल्याची कबुली दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनीच विधानसभेतील लेखी उत्तरात गेल्या २ वर्षांमध्ये नागपूर शहरात बलात्कारचे 44 गुन्हे दाखल झाले असून 2014 च्या तुलनेत बलात्कारांच्या गुन्ह्यांत 22 ने वाढ झाली असल्याची कबुली दिली आहे.

नागपूरात लुटमारीचे 166 गुन्हे दाखल झाले, त्यातही 4 ने वाढ झाली असून हत्याचे 23 गुन्हे आणि दरोड्याचे 6 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

नागपुरातल्या नागरिकांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.