कर्जत : शहरातील आमोद शरद जोशी या 32 वर्षीय तरूणाने एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला आहे.
या महिलेला कोल्हापूरला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी त्या तरुणास अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
लोधिवलीच्या जे.एच. अंबानी हायस्कूलमध्ये मुलाला प्रवेश मिळवून देतो, असं या कर्जतमधील तरुणाने या महिलेला सांगितलं होतं.
कर्जत शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या जोशी वाड्यामध्ये आमोद शरद जोशी हा तरूण राहतो.
या तरुणाने कर्जतमध्येच राहणाऱ्या एका महिलेला, तुझ्या मुलाला लोधिवली येथील जे.एच. अंबानी हायस्कूलमध्ये प्रवेश देतो, असे सांगितलं.
यानंतर भिसेगाव येथील बसस्टॉपवर या महिलेला बोलावून घेतलं. त्यानंतर तिला पळवून कोल्हापूर येथे नेऊन तेथील लॉजवर बलात्कार केला.
ही घटना २३ जून रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या पतीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना पवार यांनी आमोद जोशी याला अटक करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.