नवी मुंबई : नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसीतल्या इंदिरा नगर झोपडपट्टीत एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करत असल्याचं स्पष्ट झालंय. या महिलेने धर्माबाहेर लग्न केल्यानेही ही मारहाण होत होती.
या महिलेसोबतच तिच्या नव-यालाही बेदम मारहाण करण्यात आलीय. त्याला पालिकेच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. मारहाण कऱणा-या गुंडाचं नाव गुड्डू शेख असं आहे. त्याच्यासह त्याचे पाच नातेवाईक या मारहाणीत सहभागी होते.
पोलीस या महिलेची तक्रार दाखल करून घेत नव्हते. मात्र आता तिच्या नव-यालाही मारहाण झाल्यानंतर तक्रार दाखल करून घेतली. तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करीत असे. या महिलेने परधर्मातील मुलाशी लग्न केल्याने तिला मारहाण होत असल्याचे या महिलेने पोलिसांत तक्रार करताना सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.