नाशिक : उद्योगमहर्षी श्री. रतन टाटा यांनी नाशिकमधील बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. आणि पुन्हा एका आपण किती डाऊन टू अर्थ आहे, हे दाखवून दिले.
हे अगदी स्पष्ट आहे की, शहरांना अशा प्रकारच्या उद्यानांची गरज आहे. कारण त्यामुळे नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आणि फिरण्याची संधी मिळते. मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो की त्यांनी ही संकल्पना सत्यात आणली.
मी यापूर्वी सांगितले आहे की, या उद्यानातून इतर शहरांनाही प्रेरणा मिळावी, की एखाद्या शहरात हे घडू शकत. श्वास घ्यायला शुद्ध हवा, मुबलक ऑक्सिजन आणि सुखद हिरवळ या नागरिकांच्या जास्त महत्त्वाच्या गरजा आहेत.
हे उद्यान नाशिकच्या नागरिकांकरीता एक सर्वोत्तम भेट आहे. मला खात्री आहे की हे वाढत जाईल.
राज ठाकरे यांचे विशेष कौतुक झालं पाहिजे, त्यांनी एका शहरात ही गोष्ट साध्य केली आहे. जी इतर ठिकाणी करोडो रुपये खर्चून केलेल्या गोष्टींपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. येणाऱ्या काळात सर्वच नागरीक या करीता तुमचं कौतुक करतील आणि अनेक धन्यवाद देतील.
टाटा ट्रस्टला खूप आनंद आहे की, आम्ही या कामात राज ठाकरे यांच्या सोबत आहोत. त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार... आपण अशा अनेक गोष्टी भविष्यात एकमेंकासोबत करतच राहू.