भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना खासदारांना थोबडले

भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेना खासदार रवी गायकवाड यांना उस्मानाबादमध्ये धक्काबुक्की करण्यात आली.

Updated: Nov 23, 2014, 11:14 AM IST
भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना खासदारांना थोबडले title=

उस्मानाबाद : भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेना खासदार रवी गायकवाड यांना उस्मानाबादमध्ये धक्काबुक्की करण्यात आली.

राज्य आणि केंद्रात शिवसेना-भाजपचे तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच सेना खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजप पदाधिकार्‍यांनी धक्काबुक्की केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोरच शनिवारी दुपारी येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. 

विधानसभा निवडणुकीवरुन हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. मात्र धक्काबुक्की नव्हे, तर गायकवाड यांच्याशी 'तू-तू, मैं-मैं' झाल्याचा दावा भाजप पदाधिकार्‍यांनी केलाय.

टंचाई आढावा बैठकीसाठी महसूलमंत्री खडसे उस्मानाबादेत आले होते. सकाळी तालुक्यातील सकनेवाडी येथे त्यांच्या हस्ते ई-जमीन मोजणी उपक्रमातील सहभागी ग्रामस्थांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याचदरम्यान, ही धक्काबुक्की झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.