अमरावती : जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे बैलगाडीवरील आंदोलन बैलांसाठी चांगलंच जिकीरीचं ठरलं.
राणा यांनी त्यांच्या विभागात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा कौर जिल्हाधिकारी कार्यालयात बैलगाडीवरून निघाले.
मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करताना रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा कौर यांच्यासह फोटोसेशन करण्यासाठी उत्साही कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर मोठी गर्दी केली.
राणांच्या या कार्यकर्त्यांचा भार मात्र बैलांना सहन न झाल्यामुळं त्यांनीही रस्त्यातच ठिय्या मांडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.