RBI निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्था आक्रमक, मुंबईत काढणार मोर्चा

आरबीआयने घातलेल्या निर्बंधाविरोधात आता राज्यातील पतसंस्थांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलेय. 

Updated: Nov 19, 2016, 08:21 PM IST
RBI निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्था आक्रमक, मुंबईत काढणार मोर्चा title=

पुणे : आरबीआयने घातलेल्या निर्बंधाविरोधात आता राज्यातील पतसंस्थांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलेय. 

१ डिसेंबरला सर्व पतसंस्था बंद ठेवून मुंबईत रिझर्व्ह बँकेवर काढणार मोर्चा काढण्याची तयारी पंतसंस्था फेडशेरेशने केली आहे. तर पुढील आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

पतसंस्था फेडरेशनच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यात १५ हजार ६७० पतसंस्था असून त्यांच्याकडे २२ हजार कोटींच्या ठेवी तर १६ हजार कोटींचे कर्जवितरण आहे. 
राष्ट्रीयकृत आणि इतर नागरी सहकारी बँकांमध्ये पतसंस्थांची खाती असून त्या खात्यावर पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्जाची रक्कम भरण्यास आणि ठेवी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

राज्यातील सर्व खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तर अर्थमंत्री,पंतप्रधान आणि आरबीआय गव्हर्नर यांना ई-मेल पाठवले जाणार आहेत, तसे बैठकीत ठरले.