'२६ जानेवारीपूर्वी बेकायदा होर्डिंग हटवा'

उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंग्जकडे लक्ष वेधलं आहे. त्यावर आता महापालिका प्रशासनही सजग झालं आहे. फलकबाजीमुळे शहराचं विद्रुपीकरणच होत नाही तर रस्त्यामधोमध, तसंच दुभाजकांवरच्या होर्डिंग्जमुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघातांच्या संख्येतही वाढ होते. 

Updated: Jan 6, 2016, 08:44 AM IST
'२६ जानेवारीपूर्वी बेकायदा होर्डिंग हटवा' title=

नाशिक : उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंग्जकडे लक्ष वेधलं आहे. त्यावर आता महापालिका प्रशासनही सजग झालं आहे. फलकबाजीमुळे शहराचं विद्रुपीकरणच होत नाही तर रस्त्यामधोमध, तसंच दुभाजकांवरच्या होर्डिंग्जमुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघातांच्या संख्येतही वाढ होते. 

त्यामुळे या होर्डिंग्ज विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अली होती. त्यावर २६ जानेवारीच्या आत शहरं अनधिकृत होर्डींग्ज मुक्त करण्याच्या सूचना उच्च न्यायालानं दिल्यात. नाशिककरांनी त्याचं स्वागत केलंय. 

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनानंही राजकीय पक्षांशी पत्रव्यवहार करून, लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या सूचना दिल्यात. त्याच बरोबर महापालिकेच्या स्मार्ट अप्लिकेशनवर फोटो काढून अनधिकृत होर्डिंगबाबत माहिती देण्याच नाशिककरांना आवाहन केलय. 

दरम्यान नाशिक शहरात पालिका सत्ताधारी मनसेचीच होर्डिंग बघायला मिळताहेत. शिवाय पालिका प्रशासन आणि पोलीस दलही यात मागे नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय.