निवृत्तीनाथांना वाहिलेलं यंदाचं 'रिंगण' प्रकाशित!

पंढरपुरातल्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगण या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. 

Updated: Jul 15, 2016, 01:03 PM IST
निवृत्तीनाथांना वाहिलेलं यंदाचं 'रिंगण' प्रकाशित! title=

पंढरपूर : पंढरपुरातल्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगण या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. 

निवृत्तीनाथांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष अंकाचं संपादन केलंय पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी... यावेळी पांडुरंग फुंडकर, बबन लोणीकर, महादेव जाणकार, सदाभाऊ खोत उपस्थित होते.

सदानंद मोरे, डॉ. रावसाहेब कसबे, श्यामसुंदर निरजकर, सुनील घुमे, देवदत्त परुळेकर, अभय टिळक, निलेश बने, प्रशांत जाधव, हर्षदा परब, नंदन राहाणे अशा मान्यवर लेखकांनी घातलेली विचारांची रांगोळी यंदाच्या 'रिंगण' अंकात पाहायला मिळणार आहे. 

आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी या अंकाचं मुखपृष्ठ रेखाटलं आहे. हा अंक लवकरच सर्वत्र उपलब्ध होईल... मग वाट कसली पाहताय, तुमचा अंक आजच बुक करा.