रोडरोमियोंकडून मुलीची छेडछाड, पित्यासह भावालाही मारहाण

कॉलेज तरुणीवर रोडरोमियोंनी हल्ला केल्याची घटना घडलीय. मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हेमराज डेअरी परिसरात ही घटना घडली. 

Updated: Jun 30, 2015, 11:40 PM IST
रोडरोमियोंकडून मुलीची छेडछाड, पित्यासह भावालाही मारहाण title=

उल्हासनगर : कॉलेज तरुणीवर रोडरोमियोंनी हल्ला केल्याची घटना घडलीय. मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हेमराज डेअरी परिसरात ही घटना घडली. 

या प्रकरणी ४ रोडरोमियोंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेमराज दूध डेअरी परिसरात राहणारी २१ वर्षीय तरूणी कॉ़लेजमध्ये जात असताना, चार रोडरोमियोंनी तिचा पाठलाग केला. आणि मोबाईल नंबर देण्याचा तगादा लावला. 

तिच्यावर या रोडरोमियांची शेरेबाजीही सुरू होती. अखेर वैतागलेल्या या तरूणीने या रोडरोमियांवोर चप्पल फेकून मारली. त्यामुळे संतापलेल्या या रोडरोमिओंनी तिला मारहाण केली. 

दगड फेकून मारले. त्या तरूणीने ही गोष्ट तिच्या भाऊ आणि वडिलांना सांगताच, ते दोघं त्या रोडरोमिओंना जाब विचारायला गेले असता त्या दोघांनाही मारहाण करण्यात आली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.