आता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप

भाजपच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत असताना, आता भाजपचे आमदारही वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. 

Updated: Jul 1, 2015, 07:26 PM IST
आता, भाजपच्या आमदारावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप title=

लातूर : भाजपच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत असताना, आता भाजपचे आमदारही वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. 

निलंग्याचे भाजप आमदार संभाजी निलंगेकर यांच्या विरोधात लातूर जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 'युनियन बँक ऑफ इंडिया'च्या तक्रारीनंतर सीबीआयनं हा फौजदारी गुन्हा नोंदवलाय. 

'व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या कर्जासाठी बनावट गहाणखत आणि कागदपत्रं देऊन बँकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

संभाजी पाटलांसह कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हा नोंद झालाय. त्यामध्ये भाऊ अरविंद पाटील, बहिण प्राजक्ता मारवाह, मेहुणा आशिष मारवाह यांचाही समावेश आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.