व्हिडिओ: हे आहेत सांगलीतले शिक्षक! हे घडवणार भविष्य?

सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या 62व्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलीस आणि शिक्षक यांच्यात झटापट झाली. त्यामुळं या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. 

Updated: Aug 31, 2014, 05:00 PM IST
व्हिडिओ: हे आहेत सांगलीतले शिक्षक! हे घडवणार भविष्य? title=

सांगली: सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या 62व्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलीस आणि शिक्षक यांच्यात झटापट झाली. त्यामुळं या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. 

सभेत झालेल्या हाणामारी बाबत सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करत आहेत. सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेत सात हजार सभासद असून, हि बँक राजस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त आहे, असं असलं तरी सध्या बँकेत राजकारणच मोठ्या प्रमाणात आहे. बँकेवर सध्या शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या गटाची सत्ता आहे. तर शिक्षक नेते शि. द. पाटील आणि थोरात यांचे गट विरोधात आहेत. 

सर्वसाधारण सभा सुरु झाल्यावर विरोधिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जोरदार गोंधळ सुरु झाला त्यातच  सत्ताधारी आणि विरोधक शिक्षकांच्यात हाणामारी झाली. यावेळी रोखणाऱ्या पोलिसांशी शिक्षकांची जोरदार झटापट झाली.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.