आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाचा कारभार पुन्हा वादात

आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातला अनागोंदी कारभार आणि घोटाळ्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आधी रेनकोट खरेदी, नंतर स्वेटर खरेदी यातल्या घोटाळयांनंतर, आता आदिवासी विकास विभागाचं नाईट ड्रेस खरेदी प्रकरणही संशयाच्या भोव-यात सापडलं आहे. 

Updated: Dec 20, 2016, 06:32 PM IST
आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाचा कारभार पुन्हा वादात title=

नाशिक : आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातला अनागोंदी कारभार आणि घोटाळ्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आधी रेनकोट खरेदी, नंतर स्वेटर खरेदी यातल्या घोटाळयांनंतर, आता आदिवासी विकास विभागाचं नाईट ड्रेस खरेदी प्रकरणही संशयाच्या भोव-यात सापडलं आहे. 

वित्तीय खर्चासाठी सरकारची मंजुरी न घेता परस्पर कोट्यवधी रुपयांची नाईट ड्रेस खरेदी झाल्याचं आता उघड झालं आहे. तत्कालीन आयुक्तांच्या काळात आदिवासी विकास विभाग अधिका-यांनी सरकरला अंधारात ठेवून, पुण्यातल्या एका कंपनीला नाईट ड्रेस खरेदीचं कंत्राट दिलं.

आदिवासी विकास आयुक्तालयाचा प्रभारी कार्यभार सांभाळणा-या दोन आयुक्तांच्या कालावधीत २२ कोटींची ही खरेदी प्रक्रिया पार पडली. मात्र या संदर्भात नव्या आयुक्तांनी सखोल चौकशी करणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात आयुक्त जबादारी झटकत असल्याचा आरोप होतो आहे.