पुण्यातील भंगार गोळा करणारा 'श्रीमंत'

घरोघरी जाऊन भंगार गोळा करणाराच पुण्यात श्रीमंत निघाला. त्याला भंगारात मिळालेले चक्क एक किलो सोने या भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकांने परत केले. तेही पदरचे १५० रुपये खर्च करून.

Updated: Jan 15, 2015, 11:37 PM IST
पुण्यातील भंगार गोळा करणारा 'श्रीमंत' title=

पुणे : घरोघरी जाऊन भंगार गोळा करणाराच पुण्यात श्रीमंत निघाला. त्याला भंगारात मिळालेले चक्क एक किलो सोने या भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकांने परत केले. तेही पदरचे १५० रुपये खर्च करून.

भंगार व्यावसायिक सुभाष वडवराव. हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे. ते घरोघरी जाऊन भंगारातील माल विकत घेणाऱ्यांपैकी. त्यांनी असेच भंगार विकत घेतले होते. त्यांना भंगारात चक्क एक किलो सोने सापडले. मात्र फुकटात मिळालेले सोने त्यांनी नाकारले.

एक किलो वजनाचे हे दागिणे होते. सुभाष वडावराव यांनी प्रामाणिकपणे मिळालेले हे दागिणे त्यांनी मूळ मालकाला परत केले. याबदल्यात त्यांना ५०० रुपये बक्षिस म्हणून दिलं.

२२ डिसेंबर २०१४ रोजी पुण्यातील बांधकाम व्यवसायिक रमण निरगुडकर यांचा फोन आला. हिराबाग परिसरातील ओळखीच्या श्रीराम पेंडसे यांच्या घरातील दोन जुनी कपाटे प्रत्येकी एक हजार रुपयाला विकत घेतली. त्यांना या कपाटांसाठी गिऱ्हाईकही मिळाले. त्यावेळी त्यांनी कपाट तपासून पाहिले असता त्यांना एक कापडी पिशवी सापडली. ती उघडली असता त्यात १ किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. त्यांनी ही बाब निरगुडकर यांना सांगितली. त्यानंतर त्यांच्यामाध्यमातून दागिणे परत केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.