शनी शिंगणापूर : शनि शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन महिलेनं दर्शन घेतल्याची घटना ताजी असतानाच आणखी धक्कादायक प्रकार उघड झालाय.
शनि शिंगणापुर देवस्थानमध्ये काम करत असलेले सुरक्षारक्षकच कामावर असताना मद्यप्राशन करत असल्याचे समोर आलंय.
शनि शिंगणापुर येथे शनि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ सुरक्षा रक्षकाचे काम करत असलेले सुधाकर शेटे, भगवान सोनवणे आणि सागर एळगंडे हे तिघे श्रावण महिण्यात कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वणीच्या वेळेस मंदिरात कामावर होते. यावेळी या तिघांनी मंदिराच्या आवारात मद्य प्राशन केले.
दरम्यान या प्रकरणी या तिनही सुरक्षा रक्षकांनी माफीनामे मंदिर प्रशासनाकडे देऊन केलेल्या कृत्याबाबत माफी मागीतली आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.