भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार

 लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

Updated: Sep 17, 2014, 06:16 PM IST
भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार title=

कोल्हापूर:  लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

भाजपाचा जास्त जागांचा आग्रह शिवसेनेला मान्य करावा लागेल, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. नरेंद्र मोदींमुळं शिवसेनेला १० ते १२ जास्त जागा लोकसभा निवडणुकीत मिळाल्या हे मान्य करावं लागेल, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, सोनिया गांधी विदेशात असून त्या चार ते पाच दिवसांत परत येणार आहेत. त्या आल्यानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं पवारांनी स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामाही चार ते पाच दिवसांमध्ये घोषित करण्यात येईल, असं पवारांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.