नवी मुंबई : महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतांना शिवसेनेसमोर एक नवीन अडचण उभी राहिली आहे, कारण नवी मुंबईतील शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर चौगुले यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.
विजय चौगुले यांनी २००८ ते २०१४ या काळात आपल्याला धमकावलं, तसेच लैंगिक शोषण केलं, अशी तक्रार २६ वर्षीय तरुणीने केली होती. या वरून चौगुले यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखिल दाखल केला आहे.
विजय चौगुले मागील सात वर्षापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी होते. मात्र नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यातच चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विजय चौगुले यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावले आहेत, हे आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय, मात्र आज चौगुलेंनी या प्रकरणावरून राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.