खडसेंच्या जिल्ह्यात भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपमधले खटके वारंवार उफाळून येतच आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. आता तर जिल्ह्यातल्या शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवरचा प्रसंग आला.

Updated: Mar 7, 2015, 05:53 PM IST
खडसेंच्या जिल्ह्यात भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी title=

जळगाव : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपमधले खटके वारंवार उफाळून येतच आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. आता तर जिल्ह्यातल्या शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवरचा प्रसंग आला.

जळगावात सत्ताधारी वाळूयुद्ध 
जळगावातल्या गिरणा नदीच्या वाळूवर सर्वांचाच डोळा असतो. त्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत. कुणाच्या तरी नावे वाळू विक्रीचा ठेका घ्यायचा आणि नंतर आलेला पैसा वाटून खाण्याची पद्धतच रूढ झालीय. आव्हानी गावातल्या वाळू ठेक्यावरूनही शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. 

शिवाय एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोपही झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. मात्र यामुळे आपल्याच पक्षाची नामुष्की होईल हे ओळखून नंतर दोन्ही गटांकडून हा वाद सामोपचारानं मिटवला गेला.

महसूल विभागाच्या राज्यमंत्रीपदाच्या अधिकारांवरून जळगावात  हा वाद चिघळल्याचं बोललं जातंय. कारण काहीही असलं तरी मित्रपक्षांनी पैशांच्या वाट्यासाठी अशाप्रकारे एकमेकांचे गळे पकडणं म्हणजे हद्दच झाली, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.