डोंबिवलीत शिवसेना देतेय सुट्टे पैसे

५०० आणि १०००च्या नोट बंदीमुळे सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अत्यंत गैरसोयीचे आहे. नवीन ५०० अथवा २००० ची नोट दिली तरी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून नवीन नोट नाकारली जातेय. सर्व सामन्यांना जनतेचा मनस्ताप कमी करण्यासाठी शिवसेनेने सुट्टे पैशांची सोय करून दिली आहे.  

Updated: Nov 27, 2016, 04:21 PM IST
डोंबिवलीत शिवसेना देतेय सुट्टे पैसे  title=

डोंबिवली : ५०० आणि १०००च्या नोट बंदीमुळे सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अत्यंत गैरसोयीचे आहे. नवीन ५०० अथवा २००० ची नोट दिली तरी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून नवीन नोट नाकारली जातेय. सर्व सामन्यांना जनतेचा मनस्ताप कमी करण्यासाठी शिवसेनेने सुट्टे पैशांची सोय करून दिली आहे.  

नवीन नोटांसाठी गेली काही दिवस लोकांना अक्षरशा उन्हा तान्हात रांगेत उभं राहावं लागलं. काहींचे जीव ही गेले.  तर नोटा बदली केल्यानंतर 2000 रुपये ची नोट मिळते आणि सुट्टे करण्यासाठी लोकांना आता वेगळा मनस्ताप सहन करावा लागतोय. 

डोंबिवलीत शिवसेनेने नागरिकांना नवीन आलेली 2000 रु ची नोट सुट्टी करून देण्याची मोहीम सुरू केली आहे आणि यात नागरिकांना दिलासा तर मिळतोयच पण काही प्रमाणात का होईना लोकांचा  दैनंदिन होणारा त्रास वाचला आहे. 

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात हा उपक्रम चालू केला असून तब्बल 8 लाख सुट्टे रुपये नागरिकांना येणाऱ्या दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि तसे नियोजन करून वाटप पण करायला सुरुवात केली आहे.