औरंगाबाद : धार्मिक स्थळ हटविण्यावरून शिवसेना खासदार चंद्कांत खैरे यांची शिवराळ भाषा समोर आली आहे. खैरेंनी नागरिकांसमोर अधिका-यांना खडे बोल सुनावलेत. वेळ पडली तर आयुक्तांना मारू असं वत्कव्यदेखील त्यांनी केल्याचं या क्लिपमधून समोर आलंय.
राजाबाजार येथे अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेत काही धार्मिक स्थळ पाडण्याची तयारी पालिकेने केली असता खासदार चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आणि मंदिर पडण्यासाठी त्यांनी विरोध केला.
इतकच नाही तर खैरे यांनी पालिका अधिका-यांची खरडपट्टी काढत धार्मिक स्थळ पाडण्यासाठी विरोध केला. यापूर्वी देखील धार्मिक स्थळ हटविण्याच्या मुद्यावरून खासदार चंद्रकांत खैरे यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं होतं.
या व्हिडिओ क्लिपमध्ये वादग्रस्त वक्तव्य कैद झालंय. मात्र खासदार खैरे यांनी सर्व आरोप फेटाळले असून बकोरिया चांगले मित्र असून खैरे यानीच त्यांना औरंगाबाद पालिकेत टिकु दिल अस सांगत अनेक जण त्यांना हटवण्यासाठी मुंबईत चकरा मारत होते. त्याचं काम चांगल आहे अस सांगायला देखील ते विसरले नाहीत.