पुणे : धक्कादायक बातमी पिंपरी-चिंचवडमधून. शहरात गेल्या तीन वर्षांत केवळ सरकारी रुग्णालयांत तब्बल १७७ कुमारी माता झाल्याची धक्का देणारी बाब उघडकीस आलीय.
प्रेमप्रकरणातून झालेली फसवणूक तसंच लैंगिक अत्याचारांमुळे या मुलींवर ही वेळ आलीय. खासगी रुग्णालयात हे प्रमाण अधिकच असण्याची शक्यता आहे.
शहरात प्रामुख्यान महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात या मातांना दाखल केलं जातं. तिथून मिळालेल्या आकडेवारीतून प्रेमप्रकरणात फसवणूक झालेल्या १५ ते १७ वयोगटातल्या मुली कुमारी माता झाल्याची प्रकरणं समोर येत आहे. तर अनेक प्रकरणात मुलींना लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केलं जातं.
तर दुसरीकडे दिवसा ढवळ्या होत असलेल्या हत्या, वाढलेली गुन्हेगारी यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलंय. त्याच जोडीला या शहरांमध्ये असलेला चंगळवादही या शहरांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.