कामगारांचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

 चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेला जीएमआर उर्जा निर्मिती प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 1, 2017, 09:23 PM IST
 कामगारांचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन  title=

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेला जीएमआर उर्जा निर्मिती प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलाय. 

या प्रकल्पातील कामगारांनी वरोरा शहरातील पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या उंच टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. एकुण 10 कामगार टॉवरवर चढले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केली. 

जीएमआर प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकरी पुत्रांना नोकरी मिळावी यासाठी स्थानिकांना मोठा लढा उभारावा लागला होता. त्यानंतर कंपनीने कामावर घेतले खरे मात्र जाणून बुजून छळत असल्याचा आरोप कामगारांनी केलाय.

 किमान वेतन, कामावरून कमी करणे, प्रकल्पात सुरक्षेसह अन्य बाबी न देणे असा छळ करत असल्याचा आरोप त्यानी केला. या अन्यायाविरोधात कामगार दिनी वाचा फोडण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं.