... या सरकारी अधिकाऱ्यानं नाकारला ९० हजारांचा बोनस!

पारदर्शी आणि स्वच्च कारभार यासाठी सर्वश्रुत असलेल्या श्रीकर परदेशी यांनी आणखी एक नवा आदर्श घालुन दिलाय… श्रीकर परदेशी यांनी दिवाळीसाठी दिला जाणारा तब्बल ९० हजारांचा बोनस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनम्रपणे परत केलाय.

Updated: Nov 19, 2015, 10:58 PM IST
... या सरकारी अधिकाऱ्यानं नाकारला ९० हजारांचा बोनस! title=

पिंपरी-चिंचवड : पारदर्शी आणि स्वच्च कारभार यासाठी सर्वश्रुत असलेल्या श्रीकर परदेशी यांनी आणखी एक नवा आदर्श घालुन दिलाय… श्रीकर परदेशी यांनी दिवाळीसाठी दिला जाणारा तब्बल ९० हजारांचा बोनस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनम्रपणे परत केलाय.

सध्या पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकर परदेशी यांची आतापर्यंतची कारकीर्द पारदर्शकतेच उत्तम उदाहरण ठरलीय... पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त म्हणून डॉक्टर श्रीकर परदेसी यांनी २३ मे १२ ला सूत्रे हातात घेतली... आणि राजकीय दबावात त्यांची १० फेब्रुवारी २०१४ ला बदली करण्यात आली.

पण, या १८ महिन्यांच्या कालावधीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई, पारदर्शक कारभार यामूळ आजही त्याचं कौतुक होतंय. त्यांच्या याच पारदर्शकतेची दखल घेत त्यांना भाजप सरकारने थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नेमलं. तिथंही त्यांनी केलेल्या कामामुळे अल्पावधीतच त्यांची पदोन्नती होत त्यांना संचालक पदावर बढती दिली. 

या उमद्या अधिकाऱ्याच्या आदर्शाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. सरकारी नियमाप्रमाण पिंपरीमध्ये आयुक्त म्हणून १८ महिने काम केलेल्या श्रीकर परदेसी यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेन ९० हजार रुपयांचा बोनस चेकद्वारे पाठवला… पण, त्यांनी तो नम्रपणे नाकारला. केंद्रीय प्रशासकीय सेवेत असल्याचा संकेत पाळत त्यांनी हा बोनस नाकारलाय.

पिंपरी-चिंचवड नाही तर जवळपास सर्वच ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार सर्वांना नको नकोसा झालाय. पण श्रीकर परदेशी यांच्यासारखे अधिकारी असल्यामुळेच सर्वसामान्यांनी प्रशासनावर दाखवलेला विश्वास अजून टिकून आहे…! 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.