डोंबिवली : आपल्या सख्ख्या बहिणीची छेड़ काढणाऱ्या तिच्याच वर्गातील एका मुलाला जाब विचारायला गेलेल्या भावाला तसंच त्याच्या दोन मित्रांना मारहाण झाल्याची घटना डोंबिवलीत घडलीय.
डोंबिवलीतील सोनारपाडा दावडी येथील आर टी पी ज्युनिअर कॉलेजच्या एका विद्यार्थिनीला देवेश कांबळे नावाचा विद्यार्थी आणि त्याचे मित्र सतत छेड़त होते. अनेकदा हा प्रकार घडल्यानंतर तिनं आपल्या भावाला हा प्रकार सांगितला.
तिच्या भावानं रागाच्या भरात आपल्या मित्रासोबत देवेशला गाठलं. तेव्हा देवेश कांबळे आणि त्याच्या मित्रांनी मुलीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली.