मारळ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मारळ येथे एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्यासाठी ३६० मानकरी आमंत्रणाशिवाय उपस्थित राहतात हेच या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्ये.
यात वरपक्ष आधी मुलीला पाहण्यासाठी जातो. मुलगी पसंत पडल्यावर वधूपक्षाकडून मुलाला पहाण्याचा कार्यक्रमही होतो आणि मग दोघांच्या पंसतीनंतर होतो साखरपुडा आणि मग ठरतो लग्नाचा मुहूर्त. ही तयारी सुरू होती लग्नघटीकेची. व-हाड्यांची लगबग सुरू होती. ही सर्व तयारी सुरु होती देवाच्या अर्थात मार्लेश्वर आणि साखरपा इथल्या गिरीजा देवीच्या लग्नाची.
वाजत गाजत नवरा मुलाला मांडवात आणलं जातं. आणि सोबत असतो तो सगळा व-हाड्यांचा लवाजमा. त्यानंतर हळद लागल्यानंतर विधी केल्या जातात आणि सुरू होतो मुख्य सोहळा अर्थात देवाचं कल्याणविधी म्हणजेच मार्लेश्वर आणि गिरीजा देवीचं मंगल विवाह सोहळा. या लग्नासाठी अक्षता वाटल्या जातात आणि अशा मंगलमय वातावरणात नटून थटून आलेली सर्वच मंडळी मंगलाष्टका म्हणत हा विवाह सोहळा पार पाडतात.