पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय.

Updated: Sep 10, 2014, 04:19 PM IST
पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या title=

पुणे : पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय.

पिंपरी-चिंचवडमध्ये भासरीच्या मोशी प्राधिकरण इथल्या स्पाईन सिटीमध्ये हा प्रकार घडलाय. कनिष्क पुट्टी असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

बुधवारी सकाळी कनिष्कनं आपली जीवनयात्रा संपवली. पण, त्यानं हे पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.  

पोलिसांना कनिष्कच्या घरात कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.