महाड : सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत एकूण २६ मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत. या दुर्घटनेत २ एसटी बसेस वाहून गेल्या होत्या. तब्बल ८ दिवसानंतर या एसटीचे अवशेष नेव्हाच्या पाणबुड्यांना सापडले आहेत. घटना स्थळावरून २०० मीटरवर हे अवशेष सापडले आहेत.
८ दिवसापासून जवानांचं शोधकार्य सुरु आहे. महाड दुर्घटनेत दोन महिन्यांत बेपत्ता नागरिक अथवा त्यांचे मृतदेह सापडले नाहीत, तर त्यांना मृत घोषित करून जाहीर झालेली मदत कुटुंबियांना देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
महाड दुर्घटनेमध्ये किमान १५ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या चार दिवसांत एकही बेपत्ता नागरिक किंवा कुणाचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे नातलग अस्वस्थ आहेत. शोधकार्य अद्याप थांबलेलं नसलं तरी सावित्री नदीत मोठ्या प्रमाणावर असलेल्या मगरींचा अडथळा येत असल्याचं पाटील म्हणाले.