राज्यातला पहिला टोलनाका १३ पट वसुलीनंतर बंद होणार

राज्यातला पहिला टोल नाका म्हणून प्रसिद्ध असलेला भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका येत्या 13 मे पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणा अंतर्गत येणारा हा टोलनाका 1998 मध्ये सुरू झाला.  गेली अनेक वर्ष आयडीयल रोड बिल्डर्सच्या माध्यमातून या टोलनाक्यावर वसूली करतात.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 5, 2017, 09:18 PM IST
राज्यातला पहिला टोलनाका १३ पट वसुलीनंतर बंद होणार title=

ठाणे : राज्यातला पहिला टोल नाका म्हणून प्रसिद्ध असलेला भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका येत्या 13 मे पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणा अंतर्गत येणारा हा टोलनाका 1998 मध्ये सुरू झाला.  गेली अनेक वर्ष आयडीयल रोड बिल्डर्सच्या माध्यमातून या टोलनाक्यावर वसूली करतात.  

1998 मध्ये अत्यंत अरुंद असणाऱ्या या रस्त्यावर चार लेनचा हायवे तयार करण्यात आला.  तेव्हापासून हा टोलनाका सुरु आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी 180 कोटी रुपये खर्च झाला. पण प्रत्यक्षात या टोलवर आतापर्यंत 500 कोटी रुपये वसूली झालीय.   2002च्या गॅजेटमध्येच 13 मे रोजी हा टोल नाका बंद होणार असं जाहीर करण्यात आलं होतं.