पुणे : ऊसाच्या हमीभावावरून आता साखर संघ आणि राज्य सरकारमध्येच जुंपण्याची चिन्ह दिसत आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी सरकारनं साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य साखर संघानं केलीय.
राष्ट्रवादीचे खासदार आणि साखर संघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज साखर संघाची बैठक झाली. या बैठकीत साखरेच्या हमीभावाबाबत चर्चा करण्यात आली. शेतक-यांना हमीभाव देता यावा यासाठी, कारखान्यांना प्रति टन 700 रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. एकंदरीत हमीभावाच्या मुद्यावरून आगामी काळातही विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत असल्याचं दिसतंय.
दरम्यान, कारखाने विक्रीची चौकशी कुठपर्यंत आली असा सवालही राजू शेट्टी यांनी केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. अडचणीत आलेल्या कारखान्यांना उभं करण्याचं सोडून त्यांना उध्वस्त करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घेतल्याचं ते म्हणाले. तर कारखान्यांचं ओझं सरकारनं का घ्यावं, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.