नागपूर : ठाणे येथील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय.
या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावावा, अशी मागणी गोटे यांनी केली आहे. तसेच परमारच्या डायरीत बंटीचा उल्लेख आहे. हा बंटी कोण, हे स्पष्ट झालं पाहिजे, असं त्यांनी पत्रात लिहिलंय.
दरम्यान, ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय नेत्यांपाठोपाठ काही अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
परमार यांच्या आयकर विभागाच्या डायरीत म्हाडा, पालिका शहर विकास विभाग आणि नगर विकास विभागातील लोकांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.