ठाणे : ऐन उन्हाळ्यात टांग्यातून तलावपाळीची सफर करताना ठाणेकरांना 'कूल' अनुभव मिळणार आहे. कारण नदीम शेख आणि नवाब शेख या भावांनी त्यांचा एअर कंडिशन्ड टांगा प्रवाशांच्या दिमतीला हजर हजर केलाय.
ठाण्यातली पहिली एसी बग्गी. ब्रिटिशकालीन बग्गीसारखा दिसणारी ही बग्गी गेल्या दोन दिवसांपासून तलावपाळी परिसरात येणाऱ्या ठाणेकरांना आकर्षित करत आहे. ही साधी सुधी बग्गी नाही. ही आहे ठाण्यातली पहिली एसी बग्गी.
सहा बाय तीन आकारात या बग्गीची रचना करण्यात आली आहे. आकर्षक रोषणाई, काचा बसवून सजवलेले दरवाजे हे या बग्गीचे खास आकर्षण. यात बसवलेला एसी जनरेटरच्या सहाय्यानं चालतो. कोपरीतल्या नदीम यांनी खास लग्न सराईसाठी ही बग्गी बनवलीये.. शिवाय एसी बग्गीतून फेरी मारण्यासाठी पालक मुलांना घेऊन नक्कीच येतील असा नवाब यांना विश्वास आहे.
ठाणेकरांनीही या पहिल्या एसी बग्गीचं स्वागत केलंय. वाढत्या उकाड्यात एखादी कूल रपेट मारण्यासाठी ठाणेकर गर्दी करु लागलेत. ठाणे शहराला अनेक महत्वाच्या ऐतिहीस घडामोडींचा वारसा लाभलाय. आणि त्यात आणखीन एक भर पडलीये ती या पहिल्या एसी बग्गीची.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.