सिंधुदुर्ग : नारायण राणे ज्या मडूरे टर्मिनससाठी आग्रही होते तो प्रस्ताव मागे पडलाय. राणे व केसरकर यांच्यात याच टर्मिनसवरून गेली तीन वर्षे वाद सुरु होता. सत्ता येताच राज्य सरकारने सावंतवाडी टर्मिनल मंजुरीसाठी पाठवून एका अर्थी राणेंना चपराक दिलीय.
सिंधुदुगात टर्मिनल कुठे व्हावं यावरून गेली तीन वर्षे राणे व केसरकर यांच्यात वाद सुरु होता. राणेंना हे टर्मिनल मडूरेत हवे होते तर केसरकर यांना ते सावंतवाडीत हवे होते. याच विषयावरून राणे केसरकर यांच्यात वाद पेटला होता. त्यावेळी कॉंग्रेसची सत्ता असल्याने नारायण राणे यांची चलती होती. राणेंनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवत मडूरेसाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, कॉंग्रसची सत्ता गेल्यावर केसरकर यांनी हे टर्मिनल सावंतवाडीत होण्यासाठी पाठपुरावा केला. सध्या केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे सुद्धा सिंधुद्र्गातील असल्याने राज्याच्या प्रस्तावला बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नुकताच केंद्राकडे सावंतवाडी टर्मिनलच्या मनजुसाठीचा प्रस्ताव पाठवलाय, अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिलीय.
तसं पाहता सावंतवाडी आणि मडूरे या दोन स्टेशनमधलं अंतर आवघ चार किलोमिटरचं... पण दोन्ही नेत्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवत केंद्राचा १० कोटीचा निधी पडून ठेवला. हे टर्मिनल कुठेही करा पण बाहेर जाऊ देऊ नका अस एका बाजूला इथेले स्थानिक लोक म्हणताहेत. मात्र, अजूनही राजकारण्यांना मात्र जाग आल्याच दिसत नाही. कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांना अजूनही हे टर्मिनल मडूरेत हवंय लोकांच्या जमिनी जात असतील तर आम्ही स्थानिकांच्या बजूने राहून आंदोलन करू अशी भाषा कॉंग्रेस पदाधिकारी करताना दिसतायत.
सिंधुदुर्गात एखाद्या प्रकल्पावरून निर्माण होणारे वाद काही नवे नाहीत. आता टर्मिनलवरून निर्माण झालेला हा वाद अखेरच्या टप्यात असला तरी कोण जिंकलं आणि कोण हरलं हे नजिकच्या काळातच ठरेल. कारण या वादाची सुरुवातही टर्मिनलवरूनच झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.