ठाणे : मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही, या म्हणीचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मुंबई रेल्वेचं उदाहरण दिलं जातं. लाखो मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबईची रेल्वे आणि गर्दी, हे समिकरण ठरुनच गेलेलं आहे. त्यामुळे डब्यात चढताना धक्काबुक्की आणि प्रसंगी हातघाईचा प्रसंग तसा ठरलेलाच असतो.
मात्र ठाण्यातल्या सुजाण नागरिकांनी यावर उपाय शोधलाय आणि तोही अगदी ऐन गर्दीच्या वेळी. ठाण्यातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर सकाळी नऊ वाजता, सीएसटी करता जाणारी गाडी येते. या गाडीतल्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवासी अक्षरशः रांग लाऊन प्रवेश करतात. त्यामुळे ना इथे धक्काबुक्की हो, ना गर्दी... समजुतदार ठाणेकरांचा हा आदर्श इतरांनीही घेण्यासारखाच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.