अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प

डोळे असलेल्यांना जे दिसत नाही, ते एका अंध मुलीनं पाहिलं आणि तिला नवी दृष्टी मिळाली. एक स्पेशल रिपोर्ट. 

Updated: Nov 28, 2015, 09:49 PM IST
अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प title=

अंबरनाथ : डोळे असलेल्यांना जे दिसत नाही, ते एका अंध मुलीनं पाहिलं आणि तिला नवी दृष्टी मिळाली. एक स्पेशल रिपोर्ट. 

कोलोरॅडोमधील कुटुंब नियोजन केंद्रावर झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधइका-यासह तीन जण ठार झालेत तर नऊ जण जखमी झालेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची ओळख आणि हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

सुजाता कोंडीकीरे. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथची. खेळात निपूण. ११वीमध्ये खेळतानाच तिला अपघात झाला आणि तिच्या मेंदूला दुखापत झाली. त्यामुळे तिची दृष्टी अधू झाली. त्यावेळी शस्त्रक्रिया केल्यावर तिला पुन्हा दिसू लागलं. त्यानंतर तिनं पदवी मिळवली, तिला नोकरीही मिळाली.

आई, वडील, ३ बहिणी, एक भाऊ अशा मोठ्या परिवाराची जबाबदारी सुजाता समर्थपणे पेलत होती. मात्र ऐन पंचविशीत तिच्या जुन्या दुखण्यानं पुन्हा उचल खाल्ली. २७ वर्षांची होईपर्यंत तिला पूर्ण अंधत्व आलं होतं. तिचं आयुष्य अंधःकारमय झालं. 

तिची व्यवस्थित तपासणी केली असता डोळ्यांना रक्तपुरवठा करणारी वाहिनी अपघातामुळे निकामी झाल्याचं समजलं. अमेरिकेत यावर उपचार होऊ शकतो, मात्र त्यासाठी ४० लाखांच्या आसपास खर्च येणार होता. त्यात गुण येण्याची शाश्वती नव्हती. आपल्यावर कोसळलेल्या संकटाचा बाऊ न करता ती जिद्दीनं उभी राहिली.

आज ती स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर आहे. वैद्यकीय तपासणीच्या काळात एक गोष्ट तिला समजली. आपले डोळे चांगले आहेत, रक्तवाहिनीमध्ये दोष आहे. याचाच अर्थ नेत्रदान केलं तर एखाद्या नेत्रहिनाला दृष्टी मिळू शकेल, हे तिच्या लक्षात आलं आणि तिनं नेत्रदानाचा संकल्प सोडला. 

वैद्यकीयदृष्ट्या हे शक्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. स्वतः अंध असताना सुजातानं केलेला नेत्रदानाचा संकल्प आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.