ठाणे हत्याकांड : पोलीस घेतायेत या ६ कारणांचा शोध?

हसनैन हत्याकांडने ठाण्यासह अख्या महाराष्ट्र हादारला. हत्याकांडमागे कोणती कारणे आहेत, नक्की असे काय घडले, याचा शोध पोलीस घेतायेत. 

Updated: Mar 5, 2016, 08:22 AM IST
ठाणे हत्याकांड : पोलीस घेतायेत या ६ कारणांचा शोध? title=

ठाणे : हसनैन वरेकर हत्याकांडने ठाण्यासह अख्या महाराष्ट्र हादारला. आता या हत्याकांडमागे कोणती कारणे आहेत, नक्की असे काय घडले, याचा शोध पोलीस घेतायेत. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत. १४ लोकांचा का खून करण्यात आला. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सहा कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

 

१. हसनैन याच्यावर जवळपास ६८ लाखाचे कर्ज होते. यामध्ये आजोबा आणि मावशीकडून घेतलेले ४५ लाख रुपये तर बाकीचे सोने विकून आणि मित्रांकडून घेतलेले कर्ज यांचा यात समावेश आहे. 

२. हसनैनने हे सर्व पैसे शेअर बाजारात गमावले असावेत, अशी पोलिसांना शंका आहे.

३. फेसबूक प्रोफाईल फोटोवर प्रेम भंगाचे प्रतिक होते. एक हिंदी सिनेमातील गाणे होते. तसेच काही दिवसांपू पूर्वी हसनैन यांने माजिवडा परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. या बद्दल कुटुंबातील कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे ही खोली का घेतली होती. येथे कोण कोण येत होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. यामागे प्रेम प्रकरण तर या हत्याकांडाला कारणीभूत नाही ना, या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत.

४. या घटनेनंतर हसनैन हा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात होते. त्याच अनुषंघाने मुंबईतील एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञासोबत सल्लामसलत सुरू आहे. त्याला सिझोफ्रेनिया नावाचा आजार होता का हे ही तपासले जाणर आहे. या आजाराची दोन औषधे सापडलीत. 

५. यासाठी आता ठाणे पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञ यांना आवाहन केले आहे की ज्या  मानसोपचार तज्ज्ञाकडे हसनैनचे उपचार सुरु होते त्यांनी समोर यावे आणि पोलिसांना या गुन्ह्यात तपासासाठी मदत करावी. 

६. ज्या दिवशी हत्याकांड झाले त्या दिवशी दावतमध्ये दोन कोंबडे आणण्यात आले होते. त्यामध्ये एकाचा वापर जेवण्यासाठी करण्यात आला होता तर एक कोंबडा घरातच होता. हा कोंबडा रात्री ओरडल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातवरण होते. घर तर बंद आहे मग आवाज कोठून येत आहे, या विचाराने सर्व भयभीत झाले होते. घरात कोंबडा असल्याचे समजात सर्वांचा जीव भांड्यात पडला.