ठाणे ते डोंबिवली केवळ 15 मिनिटांत

ठाणे ते डोंबिवली हे अंतर कापण्यासाठी 35 ते 45 मिनिटे लागणार नाही. केवळ 15 मिनिटांत अंतर कापता येऊ शकणारआहे. कारण उल्हास खाडीपुलावर सहापदरी 1233 मीटरचा खाडीपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हे अंतर कापणे सहज शक्य आहे.

Updated: Sep 5, 2014, 12:16 PM IST
ठाणे ते डोंबिवली केवळ 15 मिनिटांत title=

मुंबई : ठाणे ते डोंबिवली हे अंतर कापण्यासाठी 35 ते 45 मिनिटे लागणार नाही. केवळ 15 मिनिटांत अंतर कापता येऊ शकणारआहे. कारण उल्हास खाडीपुलावर सहापदरी 1233 मीटरचा खाडीपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हे अंतर कापणे सहज शक्य आहे.

245 कोटी खर्च करुन एमएमआरडीए तीन वर्षांत 1233 मीटरचा उल्हास खाडीपूल बांधणार आहे. मानकोली ते मोटागाव असा हा सहा पदरी खाडीपूल बांधण्याच्या कामाला येत्या काही दिवसांत सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकणाने अर्थात एमएमआरडीएने दिली.

डोंबिवली आणि ठाण्यातील जनतेला यामुळे दोन्ही शहरांतील अंतर केवळ 15 मिनिटात पार करता येणार आहे. या पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. काम सुरु झाल्यापासून तीन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल. 

सध्या ठाण्यावरुन डोंबिवलीला जाण्यासाठी मुंब्रा किंवा कल्याणवरुन जावे लागते. या मार्गावर वाहतुकीचे मोठी कोंडी होत असल्याने 35 ते 45 मिनिटे लागतात. त्यामुळे अनेकांना हा प्रवास नकोसा वाटतो. ठाणे, कल्याण, मुंब्रा, डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा सहापदरी पूल बांधण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.