शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले

राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

Updated: Aug 27, 2016, 06:47 PM IST
शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले title=

पुणे : राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

आगामी महापालिका निवडणुकासाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे आमचे प्रयत्न, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना एकत्र आणणं गरजेच आहे आणि ते काम आरपीआय करेल असे मत आरपीआय नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पुण्यात समाज कल्याण अधिका-यांची रामदास आठवले यांनी  आज बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटी कायद्यावरही आठवले यांनी आपले मत व्यक्त केले.