...तर शिर्डी संस्थानाला आयकर भरावा लागणार!

साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून सगळा खर्च पार पडल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेचा आकडा आता तब्बल 736 कोटी रुपयांवर जाऊन पोहचलाय. ही रक्कम येत्या पाच वर्षात खर्च न केली गेल्यास साईसंस्थानला आयकर भरावा लागणार आहे.

Updated: Jan 2, 2015, 01:54 PM IST
...तर शिर्डी संस्थानाला आयकर भरावा लागणार! title=

शिर्डी : साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून सगळा खर्च पार पडल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेचा आकडा आता तब्बल 736 कोटी रुपयांवर जाऊन पोहचलाय. ही रक्कम येत्या पाच वर्षात खर्च न केली गेल्यास साईसंस्थानला आयकर भरावा लागणार आहे.

शिर्डीच्या साईबाबानां साईभक्त मोठया श्रध्देने दान करतात. साईभक्तांच्या दानातुन आज पर्यंत साई संस्थानकडे कोटयावधींची रक्कम जमा झाली आहे. मात्र भाविकांच्या दानातून करोडपती झालेले साईबाबा संस्थान भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यात मात्र कमी पडत आल्याच दिसून येतय. 

इतक्या मोठया प्रमाणात रक्कम शिल्लक असूही साई भक्तांसाठी दर्शनरांगा, पाणी सुविधा आणि शौचालयांची कमी पडत असल्याचं सध्याच्या गर्दीवरुन दिसून येतं. 

साई संस्थानकडे सन 2010 ते मार्च 2014 या आर्धिक वर्षात तब्बल 736 कोटी अखर्चीत निधी जमा झालाय. हा निधी योग्य कामासाठी खर्च का केला गेला नाही? असा प्रश्न भक्तांकडून विचारला जातोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.