पुणे : इंजिनिअरींगच्या पेपरपफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसमधून हे पेपर्स फुटले त्या कॉलेजेसना विद्यापीठाकडून कापणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
इंजिनिअरिंगचे २ पेपर्स व्हाट्सॲप वरून व्हायरल झाल्याच्या प्रकाराला विद्यापीठाने याआधीच दुजोरा दिलाय. हे पेपर्स नगर जिल्ह्यातील बोटा इथल्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तसेच पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी इथल्या डी वाय पाटील कॉलेजे ऑफ इंजिनिअरिगमध्ये परीक्षा सुरु होण्यापूर्वी डाऊनलोड करण्यात आले होते. तिथूनच ते कोणाच्या तरी मार्फत व्हाट्सअॅपवर पाठवण्यात आले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यातील एमआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांकडे तसेच रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्याकडे मोबाईलमध्ये हे पेपर्स आढळून आले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर कोथरूड तसेच लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान या पेपरफुटी प्रकरणी आज अभाविपच्यातर्फे विद्यापीठात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे कुलगुरु म्हणून गेल्याच आठवड्यात कार्यभार स्वीकारलेल्या डॉ. नितिन करमळकर यांना आल्या आल्या आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे.