जळगाव : आज सर्वत्र अक्षय्य तृतियेचा सण साजरा होत असतांना, खान्देशात आखाजीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. आखाजीच्या दिवशी खास खापरावरची पुरणपोळी घरोघरी केली जाते, या सोबत आमरस आणि खास तिखट असा रस्सा असतो. याची चव खान्देशात गेल्यावरच कळते.
आखाजीला खान्देशात महिलामंडळ झोक्यावर झोके घेतं, आहिराणीत गाणी म्हणतात, ही गाणी खास आहिराणी भाषेत असल्याने वर्षानुवर्षे गायली जात आहेत, पण आजही या गाण्यातील गोडवा, आखाजीच्या पुरणपोळीसारखा कायम आहे.
खान्देशात तसे पाहिल्यास खऱ्या अर्थाने आज नव्या वर्षाची सुरूवात होते, शेतीचा बजेट अंदाजाने ठरवला जातो, पहिली सुरूवात वर्षभरासाठी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सालदार ठरवला जातो, आधुनिक भाषेत त्याचं पॅकेज ठरवलं जातं. मागील काही दिवसांपासून सालदारकी करण्यास लोकं फारसे उत्सुक नसल्याचं दिसून आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.