कोल्हापूर : शहरातील टोल नाक्यांवर १५ दिवसांसाठी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. टोल वसुलीबाबत आणखी एक समिती सरकारने नेमली आहे, या समितीचा अहवाल आल्यानंतर टोलवसुलीवर शेवटचा निर्णय घेण्यात येणार आहे.
यावरून कोल्हापूरकरांच्या साडेचार वर्षाच्या आंदोलनाला यश आलं आहे. कारण कोल्हापूरच्या टोलमुक्तीवर आज मंत्रालयात बैठक होती.
आजपासूनच टोल बंद करण्याच्या सूचना आयआरबी कंपनीला दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजताच कोल्हापूरातील टोल नाके बंद झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.