टोमॅटोचा दुप्पट भाव, सामान्यांचा कापणार खिसा

बाजारात पुरवठ्यात घट झाल्यामुळे टोमॅटो ६० रुपयावर गेला आहे. नाशिकमधेही हीच परिस्थिती असून भाव दुपटीने वाढले आहेत. नाशिकच्या किरकोळ बाजारात किलोला ८० रुपये भावाने टोमॅटो विकला जातोय.

Updated: Jun 19, 2016, 10:09 PM IST
टोमॅटोचा दुप्पट भाव, सामान्यांचा कापणार खिसा title=

नाशिक : बाजारात पुरवठ्यात घट झाल्यामुळे टोमॅटो ६० रुपयावर गेला आहे. नाशिकमधेही हीच परिस्थिती असून भाव दुपटीने वाढले आहेत. नाशिकच्या किरकोळ बाजारात किलोला ८० रुपये भावाने टोमॅटो विकला जातोय.

राज्यात सर्वत्र दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे महिनाभरात टोमॅटोचे भाव तब्बल ५० टक्क्यांनी वधारून किरकोळ बाजारात ८० रुपये किलो झालेत. अधिकृत आकडेवारीनुसार नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी टोमॅटो चाळीस रुपये किलो होते. मात्र पाण्याचा दुष्काळ आणि पाऊस लांबल्याने भाव वाढत वाढत बाजारसमितीत हजार रुपये जाळीने विकले गेलेत. टोमॅटोंच्या भावातील वाढीचा हाच कल सगळ्या महत्त्वाच्या केंद्रांवरही होता.

टोमॅटोच नाही तर सर्वच भाजीपाला याच कारणामुळे तेजीत होता. दोडके, फळभाज्या आणि पालेभाज्या या शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्या होत्या. डाळ दोनशे रुपये किलो झालेली असताना टोमॅटोसुद्धा सामान्यांचा खिसा कापतायत.

महागाईचा आगडोंब दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळं सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. वरुणराजाच्या कृपेनंतर तरी महागाईची झळ कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.