मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

होळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होतेय.. 

Updated: Mar 12, 2017, 07:58 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी title=

माणगाव : होळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होतेय.. 

महामार्गावर खारपाडा, वडखळ, कोलाड, माणगाव इथं वाहनांच्या लांबचलांब रांगा पहायला मिळतायत. वडखळ ते हमरापूर फाटा हे अंतर पार करायला तब्बल दीड तास लागतोय. 

माणगाव बाजारपेठेतही होळी निमित्त गर्दी असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. वाहतूक पोलीस असले तरी यंत्रणा कमी पडतेय. महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या रूंदीकरणाच्या कामामुळे वाहतूकीत अडथळे येतायत. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडतेय.